MPSC चा मोठा निर्णय 2022 : आयोगाने संधीची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय रद्द केला आहे.
मित्रांनो, आपण पाहिले आहे कि कोरोना काळात एम् पी एस् सी परिक्षा वारंवार पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्यामुळे विद्यार्थांचे खूप नुकसान झाले होते. परिक्षा होत नाही म्हणून खूप विद्यार्थी हताश झाले होते विद्यार्थांवर आंदोलने करण्याची देखिल वेळ आली होती आणि वर भरिस भर म्हणून आयोगाने परिक्षा देण्यासाठी विहित केलेल्या वयोमर्यादेत संधीच्या मर्यादा घातल्या होत्या, त्या मुळे पराक्षार्थींत भीती व नाराजगीचे वातावरण निर्माण झाले होते.
पण आज आम्ही आपणासाठी आनंदाची बातमी घेउन आलो आहोत. आता परीक्षार्थी आयोगाने विहित केलेल्या वयोमर्यादेत परिक्षेत कितीही अटेम्ट (संधी) देउ शकतात. ही माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
विद्यार्थांचा रोष लक्षात घेऊन आयोगाने आपला या पुर्वीचा विविध स्पर्धा परीक्षांस बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न/ संधीची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय रद्द केला आहे.
आयोगाच्या पुर्वीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना संधींच्या मर्यादा आल्या होत्या. संधी मर्यादा संपल्यावर परीक्षा देता येणार नव्हत्या. आता आयोगाने निच्छित केलेल्या वयोमर्यादेत उमेदवार कितीही वेळेस परिक्षा देउ शकतात.
तर मग आयोगाच्या नविन निर्णयाचे स्वागत करुन लागा तयारीला!!!!
धन्यवाद!!!!!
Comments