MHT CET EXAM: CET परीक्षेचे हॉल तिकीट आले आहे इथे दिलेल्या लिंक वरुन डायरेक्ट डाऊनलोड करा.
नमस्कार मित्रांनो,
MHT CET 2022 साठी पीसीएम(PCM) गटासाठी महाराष्ट्र सीईटी 2022 परीक्षा 5 ते 11 ऑगस्ट आणि पीसीबी(PCB) गटासाठी, 12 ते 20 ऑगस्ट दरम्यान परीक्षा घेतली जाईल. हि परिक्षा ऑनलाइन पद्धतीने आयोजित होणार आहे. MHT CET 2022 परीक्षा संगणकवर घेतली जाणारी mht cet exam आधारित चाचणी (CBT) परिक्षा आहे.
सर्व यशस्वीरित्या नोंदणी केलेल्या उमेदवारांना MHT CET 2022 प्रवेशपत्र जारी केले जाइल व यशस्वीरित्या नोंदणी केलेल्या उमेदवारांनाच परीक्षा देता येणार आहे. उमेदवारांनी MHT CET आफिसिअल पोर्टलवर लॉग इन करुन प्रवेशपत्र डाउनलोड करावे. वैध MHT CET प्रवेशपत्र 2022 असल्या शिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षेला बसण्याची परवानगी नाही.
MHT CET 2022 ही महाराष्ट्रातील तब्बल 226 परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षेसंबंधी चे नविन अपडेट, बदल, तारीख आणि परीक्षेचे संबंधित इतर अपडेट जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी MHT CET च्या ऑफिसीअल साईटवर जाउन वेळोवेळी अपडेटस् तपासत राहणे आवश्यक आहे.
परीक्षा झाल्यावर काही दिवसांनी निकाल MHT CET च्या ऑफिसीअल साईटवर ऑनलाइन प्रक्षेपित होईल त्यावेळेस विद्यार्थी आपला MHT CET 2022 चा निकाल ऑनलाइन पद्धतीने आपला board exam अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरून तपासू शकतील. MHT CET 2022 च्या निकालामध्ये उमेदवारांना जे काही गुण मिळतील त्यानुसार रँक निश्चित केली जातील. विद्यार्थ्यांना मिळालेल्या रँक नुसार केंद्रीकृत महाविद्यालयाच्या जागांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असतील. ही सर्व प्रक्रिया (CAP) ऑनलाइन पद्धतीने पार पाडली जाईल. विद्यार्थ्यांना पसंतीनुसार महाविद्यालयाच्या निवडी भरावी लागेल.
Direct Link to Download MHT CET 2022 Admit Card
MHT CET PCM/PCB Admit Card 2022 ![]()
Comments