Marathi jokes | मराठी चुटूकले, चावट मराठी विनोद🤪🤣😂😁 |मराठी अफलातून जोक्स!!|
नेहमी हसत राहणे हे आपल्या स्वास्थ्या करता खूपच उत्तम असते. यामुळे आपले मन हलके होते व आपला तान कमी होण्यास मदत होते. चला तर मग पाहूया आपले मराठी अफलातून जोक्स.
1. मोठे पोट:
2. स्ट्रगल म्हणजे काय?:
हया आजकालच्या कार्ट्यांना स्ट्रगल म्हणजे काय, हे माहितीच नाही!
आम्ही black & white TV वर इंग्लंड vs वेस्टइंडीज मॅच बघायचो.
Brightness वाढवला तर इंग्लड वाले गायब...
आणि कमी केला तर वेस्ट इंडीज वाले गायब!
😆😆🤦🏻♂🤦🏻♂
3. Fogg Deo लावून परीक्षा देण्याचा परीणाम:
गण्या Fogg Deo लावून परीक्षेला गेला …..
पेपर संपे पर्यन्त मॅडम जवळच उभ्या राहिल्या …..
गण्या नापास झाला.
🤣🤣🤣
4. 😳😂 अखेर पुणेकरांना निरुत्तर करणारा भेटला...! 😂😳
_सदाशिव पेठेत उभा राहून नागपुरी व्यक्ती एका पुणेरी व्यक्तीला विचारतो..._
.
नागपुरी व्यक्ती 😱 😗 ओ भाऊ, हयोच का हो तो शनिवार वाडा बाजीराव मस्तानीचा...??
.
पुणेरी व्यक्ती 😒 😗 (आपल्या नेहमीच्या पुणेरी अंदाजात)
.
इतिहास दफ्तरी नोंद असल्याप्रमाणे मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीराव प्रथम द्वारा १० जानेवारी १७३० रोजी पायाभरणी तसेच २२ जानेवारी १७३२ रोजी वास्तुशांत केलेली इमारत म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हात "शनिवार वाडा" 🏰 ती हिच....!!
.
_भाषेवरून विदर्भातले वाटतात, 😒 गाव कोणते तुमचे...???🤔🤔_
.
नागपुरी व्यक्ती 😏 😗 जशास तसे या मुद्रेत येऊन...
.
भारतीय उपखंडातील २१'८ उत्तर अक्षांश व ७९'५ पूर्व रेखांश मध्ये येणारे, मध्य भारतात ० मैल स्तंभ असलेले देशाचे केंद्रबिंदू, सिट्रस सिनेन्सिस 🍊 या लिंबु वर्गीय आंबट मधुर चवयुक्त फळाचे उत्पत्ति स्थान,
नाग नदीच्या काठी वसलेले, पुरातन कालीन संबोधले जाणारे दुहेरी अवतरण चिन्हात "फनिन्द्रपुर" वा "नारंगपुर" येथील मी रहिवाशी...!!
पुणेरी व्यक्ती 🤔 😗 अहो म्हणजे काय..??
.
नागपुरी व्यक्ती 😀 😗 भाऊ, नागपुरचा हायनं मी....!!
.
पुणेरी व्यक्ती 😡 😗 अहो मग सरळ सोप्या भाषेत सांगायचे कि...
.
नागपुरी व्यक्ती 😔 😗 _भाऊ, तुम्ही मले इतिहास शिकवला, 📄 म्या तुम्हाले भुगोल 🌍 शिकवला,_
_हिशोब बराबर...!😃_
😇😂😃😀😅😆
5.*♻️ जीवन चक्र ♻️*
माणूस फळं सोडून वडापाव, सामोसे खातो मग आजारी पडून दवाखान्यात जातो. दवाखान्यात त्याला त्याचे नातेवाईक सफरचंद, संत्रे, द्राक्ष खायला देतात आणि नातेवाईक दवाखान्याच्या बाहेर बसून वडापाव, सामोसे खातात.
हे आहे बाकी सर्व मोहमाया आहे.
😇😂😃😀😅😆
6.*♻️ वकिलाची बायको ♻️*
मजेदार करार:
मी पण दाखवून देते की मला ही कायदा समजतो. म्हणून ३१ डिसेंबर च्या पार्टी मध्ये जाणlऱ्या वकील नवऱ्याला ती म्हणते " एका शर्तीवर तुम्हाला जाऊ देईल. बॉण्ड पेपर वर लिहून द्या की : "मी आजच्या पार्टीत दारू पिणार नाही, प्यालो तर आयुष्यभर बायकोचा गुलाम होऊन राहील."
वकील नवऱ्याने बिनधास्त बायकोला लिहून दिले की: "मी आजच्या पार्टीत दारू पिणार, नाही प्यालो तर आयुष्यभर बायकोचा गुलाम होऊन राहील.
" पती-पत्नी दोन्ही खुश, मात्र मधला कॉमा कन्फ्युज....
😜😜😂😂🥂🥂
7) श्रध्दा आणि अंधश्रद्धा
मुलगा : "बाबा, 'श्रध्दा आणि अंधश्रद्धा' मध्ये काय फरक आहे...?"
बाबा : "देवाने दात दिले आहेत तर खायला शेंगदाणेही देईल ही 'श्रद्धा...'
आणि.….
आपण कोणाच्या घरी गेलो अन् त्यांनी खायला शेंगदाणे दिले, तर आता ते बाटलीही काढतील, अशी अपेक्षा ठेवणे ही 'अंधश्रद्धा....!' "
🤣 🤣🤣😁😁😆😆

Comments