थोडे हसूया!
आजच्या धका धकिच्या जिवनात तुम्हा आम्हावर आपल्या सगळ्यावर प्रचंड ताण वढला आहे. तर मग ह्या धकिच्या जिवनातुन थोडावेळ काढून आपण सगळे थोडे हसूया आणि प्रसन्न मनाने पुन्हा नविन जोश व चैतन्याने उल्हासित होउन कामाला लागूया. बघूया काही मराठी जोक जे आपला सर्वांचा मूड बनवतील.
चला तर मग.....
आजकाल टिव्ही वर एवढे देवांचे प्रोग्रॅम लागत आहेत की.......
रात्री झोपताना टीव्हीकडे पाय करून झोपायला पण भीती वाटते, पाप लागेल की काय?
😀😀😀
जेव्हापासून बुलेट मध्ये Self Starter आले आहे तेव्हापासून.......
एका झापडीत खाली पडणारे लोक सुद्धा बुलेट घेऊन फिरायला लागले आहेत
😀😀😀
हरवलेलं प्रेम एक वेळा परत मिळेल पण......
गाडी पुसायचा फडका कधीच परत मिळणार नाही. फडकी चोर साले
😀😀😀
मोबाईल वापराचा आता इतका अतिरेक झालाय की......
परवा शेजारी बसलेला एक जण पेपरमधील चित्र बघता बघता अचानक २ बोटांनी झूम करायचा प्रयत्न करायला लागला होता
😀😀😀
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका जी......
व्यक्ती तुम्हाला तुमचा नेट पँक नसताना हाँटस्पाँट देते😀😀😀
Office मध्ये बॉसच्या फालतू जोकवर तोच जोरात हसतो ज्याचा.....
EMI सर्वात जास्त असतो
😀😀😀
आमच्याकडे एक इंजिनियर आहे त्याच्या कामात चूक काढली की त्याचे नेहमीचे वाक्य,........
“साहेब लय बारीक बघितलं की बाईला पण मिशा दिसत्यात”
😀😀😀
बायका फार नशीबवान असतात कारण........
त्यांना बायका नसतात
😀😀😀
हे एक गोष्ट खरी आहे हा… जगात सर्व माणसांची वेगवेगळी नावे आहेत पण........
गर्दीत जेव्हा आपण एखाद्याला आवाज देतो, “ए माकडा” तेव्हा १५ पैकी १२ जण तरी मागे वळून पाहणारच
😀😀😞
अॅक्टीवाच्या सायलेंसरवर बायकोचं नाव लिहिलं तर.......
“बुलेट” चा आवाज येतो म्हणे….
😀😀😀
बाबा : आजपर्यंत तु असं काही काम केलंस का ज्याने माझी मान वर होईल?
मुलगा : एकदा तुमच्या डोक्याखाली उशी लावली होती, विसरले का लगेच?
😀😀😀
लहान असताना झोपेत हसलो की आई म्हणायची सटवाई खेळवते आणि आता........
हसलो तर बायको म्हणते कोणती सटवी खेळवते.
😀😀😀
मुलगी : तुझी आठवण येतेय
मुलगा : अजून पगार झाला नाही
मुलगी : अच्छा चल बाय नंतर बोलू
😀😀😀
तुमचा बेस्ट फ्रेंड जर चुकिच्या मुलीच्या प्रेमात पडला असेल तर त्याला अडवू नका कारण.........
अक्कल बदाम खाल्ल्याने नाही धोका खाल्याने येते
😀😀😀
त्या मुली पण काही आतंकवाद्यांपेक्षा कमी नव्हत्या, ज्या.....
सर वर्गात येताच आठवण करुन द्यायच्या
– सर आज तुम्ही गृहपाठ चेक करणार होता ना?
😀😀😃
काय दिवस आलेत, चौथी पाचवीची पोरं प्रेमाच्या गप्पा मारतायंत आणि............
तरुण पोर pokemon पकडत फिरतायंत
😀😀😀
समस्त स्त्री जातीला पडलेला एक गहन प्रश्न..........
पुरुष तर कधीच उपवास करत नाहीत तरीही त्यांना आपल्या सारख्या चांगल्या बायका कशा मिळतात??
😀😀😀
सर्वच आईवडिलांचा सर्वात सुंदर डायलॉग..........
डोकं तर खूप आहे त्याला पण तो अभ्यासच करत नाही
😀😀😀
ज्यांचे पुण्य अपार असते …
त्यांच्या बायकोचे माहेर किमान ३०० किलोमीटर दूर असते
😀😀😀
लग्नाच्या वरातीत कितीही नाचणारे तीस मार खान येउद्यात
हवा फक्त त्याचीच होते जो..........
झोपून नागीण डान्स करतो.
😀😀😀
भारत सरकारचा नवीन नियम...........
ज्यांचा मोबाईल कँमेरा २ मेगा पिक्सेल आहे अशांना दारिद्र रेषेखालील घोषित करण्यात येईल
😀😀😀
तुम्हाला माहित आहे काय पॉपकॉर्न कढईत ठेवल्यावर उड्या का मारतात?
स्वतः गरम कढईत बसून पहा, मग आपोआप समजेल
😀😀😀
बायकांना खुश ठेवणे खूप मुश्किल आहे
पुरुषांचे काय…........
बायका दिसल्या की खुश होतात
😀😀😀
व्यायाम करणे, ह्याने तुमच्या आयुष्यात काही वर्ष नक्की वाढतील पण...........
लक्षात ठेवा की ही वर्षे तुमच्या म्हातारपणातली वाढणार आहेत, तरुणपणातली नव्हे
😀😀😀
बासुंदीचा फुल फॉर्म सापडला...........
बासुंदी: बाई सुंदर दिसते
😀😀😀
ATM मधून २०० रुपये निघताना इतका आवाज होतो की.....
असं वाटतं की चुकून ४-५ हजार निघतात की काय…
😀😀😀
चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो देवमाणूस आणि जो.....
कधी चुकतच नाही तो बायकोच्या माहेरचा माणूस
😀😀
इतर महत्वाचे लेख:
AC चा योग्य, वापर, नुकसान व फायदे. करा विजबिलात बचत.
Earn money online| घर बैठे इन्टरनेट से ऑनलाइन पैसे कैसे कमाए? 2022|
Share Market: बाजार में पैसा डूबने से बचाना चाहते हैं तो ये 12 गलतियां कभीभी ना करें।
Comments