ग्रामीण आधार कार्डधारकांना मोठा दिलासा! आता तुम्हाला तुमचे आधार कार्ड बनवण्यासाठी आणि बदलून घेण्यासाठी जवळील तालुका किंवा शहरात जाऊन बँका, पोस्ट ऑफिसमध्ये किंवा आधार केंद्रात जाण्याची गरज नाही. येथे तपशील जाणून घ्या.
ग्रामीण आधार कार्डधारकांना मोठा दिलासा! आता तुम्हाला तुमचे आधार कार्ड बनवण्यासाठी आणि बदलून घेण्यासाठी जवळील तालुका किंवा शहरात जाऊन बँका, पोस्ट ऑफिसमध्ये किंवा आधार केंद्रात जाण्याची गरज नाही. येथे तपशील जाणून घ्या.
आपण सर्वांना माहिती आहे आज आपणास कोणतेही व्यवहार करण्यासाठी अधार कार्ड गरजेचे आहे मग ते खरेदी विक्री किंवा बँक अकाउंट असो किंवा PM Mudra loan काढाने असो.
पूर्वी जर आपल्याला अधार कार्ड मध्ये काही बदल करायचे असल्यास आधार केंद्रात जाऊन टोकन घेऊन किंवा रांगेत तासन तास वाट बघावे लागत होते. आतापर्यंत त्यात ही गावातील लोकांना आधार कार्ड काढण्यासाठी किंवा त्यात दुरुस्ती करून घेण्यासाठी जवळील तालुका किंवा शहरात जाऊन बँका, पोस्ट ऑफिसमध्ये जात होते, त्या दरम्यान त्यांना तासनतास प्रवास करून भाडे खर्च करावे लागत होते. मात्र, आता सरकारच्या काही प्रयत्नांनी त्यांना गावातच सर्व सुविधा मिळणारं आहेत. यामुळे त्यांचा वेळ आणि पैस्यांची बचत होणार आहे.
आता गावातील लोकांना आधार कार्ड काढण्यासाठी किंवा त्यात दुरुस्ती करून घेण्यासाठी जावळील तालुका किंवा शहरात जाऊन बँका, पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागर नाही. त्यांना गावातील शाखा पोस्ट ऑफिसमध्येच आधार कार्ड बनवता येणार आहे. याशिवाय आधार कार्डमध्ये दुरुस्त केलेले नाव, जन्मतारीख आणि पत्ताही व इतर माहिती ही ते थेट आपल्या गावातील पोस्ट ऑफिस मधेच दुरुस्त करू शकणार आहे. म्हणजे आता गावातील लोक गावातील पोस्ट ऑफीस मधेच आपल्या आधार कार्ड वरील माहिती गावातील पोस्ट ऑफिस मध्येच अद्यावत करू शकणार आहेत. करण टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवकांना आधार कार्ड व्यवहारासाठी काही अद्यावत उपकरण दिले असून त्याद्वारे त्यांनी कामाचा करण्यास सुरुवात केली आहे.
आता टपाल विभाग गावागावात उघडलेल्या ग्रामीण टपाल कार्यालयांचे डिजिटलायझेशन करून विविध सुविधा पुरवत आहे. त्याचा फायदा ग्रामीण विभागातील लोकांना होणार आहे. या पूर्वी पोस्ट ऑफिसमध्ये आपण आरडी डिपॉझिट, सुकन्या समृद्धी योजना इत्यादींसाठी पैसे जमा करत असोत, व अपले टपाल आणण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी जात होतो. पण आता टपाल विभागात जीडीएसच्या माध्यमातून आधार कार्डही व त्यातील आवश्यक बदल करता येणार आहे.
वरिष्ठ टपाल अधीक्षक नरसिंग म्हणाले की, 130 ग्रामीण शाखा पोस्ट ऑफिसमध्ये लोकांना दुरुस्तीसह नवीन आधार कार्ड बनवता येणार आहे. ही सेवा पहिल्या टप्प्यात आतापर्यंत केवळ 130 टपाल कार्यालयांना ही सुविधा मिळत आहे. टप्या-टप्प्याने उर्वरित पोस्ट ऑफिसमध्येही ही सुविधा गावकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. ग्रामीण डाक सेवकांना विभागाकडून मिळालेल्या यंत्रावरून आधार कार्डमध्ये बदललेले नाव, पत्ता इत्यादी माहिती अद्यावत करता येणार आहे. त्या साठी ठरवून दिलेली फी भरुन नवीन आधार कार्ड देखील काढता येणार आहे.
ग्रामीण टपाल कार्यालयांचे डिजिटलायझेशन करून विविध सुविधा पुरवत आहे. त्याचा फायदा ग्रामीण विभागातील लोकांना होणार आहे आणि या मुळे ग्रामीण भागातील जनतेचा वेळ आणी पैसा वाचणार आहे आणी होणारा त्रास ही कमी होणार आहे.
जर ही माहिती तुम्हाला महत्वाची वाटल्यास या पोस्ट ला share करून ही माहिती गरजु व्यक्ती पर्यंत पोहचवावी. जेणे करून आपल्या ग्रामीण बांधवांचा पैसा व वेळ वाचेल व त्यांना होणारा त्रास व दग-दग वाचेल.
धन्यवाद!!!!!

Comments