मराठी जोक. मराठी चावट जोक. मराठी चुटुकले.
नमस्कार मित्रांनो
आजच्या धका धकिच्या जिवनात तुम्हा आम्हावर आपल्या सगळ्यावर प्रचंड ताण वढला आहे. तर मग ह्या धकिच्या जिवनातुन थोडावेळ काढून आपण सगळे थोडे हसूया आणि प्रसन्न मनाने पुन्हा नविन जोश व चैतन्याने उल्हासित होउन कामाला लागूया. बघूया काही मराठी चावट जोक जे आपला सर्वांचा मूड बनवतील.
1. एक मुलगा रस्त्याने जाता जाता पाय घसरून गाढवाच्या पुढ्यात पायाजवळ पडतो. तेवढ्यात तिथून एक मुलगी जात असते.
मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का?
मुलगा: होय, वहिनी!
2. एक मुलगी आपल्या चेहर्याला स्कार्फ बांधून बसची वाट पाहात बसस्टॅण्डवर उभी असते.
तिकडून एक व्यक्ती बाईकवर येतो आणि बाईक स्कार्फ बांधलेल्या मुलीजवळ थांबउन तिला म्हणतो,
"ए, आती क्या खंडाला?"
... त्यावर मुलगी रागात उत्तरते,
"अहो पप्पा...मी आहे"
3. बायको: माझ्या छातीत खूप दुखत आहे.
नवरा: डाॅक्टरला दाखव मग.
बायको: दाखवले.
नवरा: डॉक्टर काय म्हणाले
बायको: ते म्हणाले Wow.
4. एकबालचे अबू TV वर अश्लिल मूव्ही बघत असतात..
अचानक एकबाल येतो तर परिस्थिती सांभाळण्यासाठी
एकबालचे अबू म्हणतात...
"अरे गरीब मुली आहेत या....कपडे विकत घेण्यासाठी पैसे नसतात यांच्याकडे... "
तर एकबाल म्हणतो...
"यांच्यापेक्षा अजून गरीब मुली आल्या तर मला पण बोलवा..."
5. पहिला मित्र: 4 दिवस महाबळेश्वर ला चाललोय रे...
रस्त्यात बायकोला दरीत लोटून देणार आहे...
दुसरा मित्र: सही...माझी पण घेऊन जा, तिलापण दे ढकलून..
पहिला मित्र(थोडा विचार करून): hmm ... येताना टाकली तर चालेल का?
जोक 6 सर्व विवाहित बांधवांना समर्पित:
6. जर कोलंबसला मराठी बायको असती तर त्याला अमेरिकेचा शोध कधीच लागला
नसता... कारण बायकोने विचारले असते...
कुठे चाललात?
कोणा बरोबर?
कसे जाणार?
काय शोधायला जाताय?
...इकडे मिळणार नाही का?
नेहमी तुम्हीच का?
मी इथे एकटी काय करू?
मित्र बरोबर असतीलच ना?
दारू ढोसणार असणार?
मी पण येऊ का?
सोबत जाऊत का?
कोलंबस: जाउ दे नाही जात...
या पैकी तुम्हाला कोणता जोक आवडला कमेंट्स करून सांगा!!!!
Comments