महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) बद्दल थोडक्यात माहिती. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) काय आहे?
नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत.
जे कुणी नवीन विद्यार्थी मित्र MPSC ची तयारी करणार आहेत त्यांच्या साठी हा खास लेख आहे.
आपण सर्वांना माहित आहे की, महाराष्ट्र अधिवासी असलेले उमेदवार ज्यांच्याजवळ महाराष्ट्राचे अधिवासी/ रहिवासी प्रमाणपत्र असलेले उमेदवार परीक्षेला बसण्यासाठी पात्र आहेत.
आपल्या माहितीसाठी आपण सर्व विद्यार्थी मित्रांना सागण्यास आनंद होत आहे की, MPSC ने 2020-21 च्या नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार आयोगाने उमेदवारांच्या अर्जांसाठी जास्तीत जास्त प्रयत्नांची संख्या निश्चित केली होती, ती घोषणा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मागे घेतली आहे.
काय आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ?
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही एक घटनात्मक संस्था आहे. ती भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अन्वये स्थापन केलेली आहे. MPSC चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला अनुच्छेद ३१५ अंतर्गत महाराष्ट्राच्या भारतीय राज्यासाठी गट 'अ' आणि गट 'ब' नागरी सेवकांची निवड करण्यासाठी अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि आरक्षण नियमांनुसार तयार केलेली संस्था आहे.
टिप: महाराष्ट्रातील काही परिक्षांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) हा भारतीय राज्यघटनेने कोणत्या अनुच्छेदा अंर्तगत आहे? असे प्रश्न देखिल विचारलेले आहे.
Important link
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्य सेवा अभ्यासक्रम
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे मुख्य काम:
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे मुख्य काम महाराष्ट्र सरकारचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी आणि सरकारच्या कामकाजाला आवश्यक असलेली कार्यक्षमता पुरवण्यासाठी विविध सरकारी पदांसाठी योग्य उमेदवार उपलब्ध करूने आणि त्यांना/त्यांच्या भरतीच्या सुसूत्रीकरणासारख्या विविध सेवाविषयक बाबींवर सल्ला देणे, विविध नियम बणवने , पदोन्नती देने, बदल्या करने आणि शिस्तभंगासारख्या कृतीवर कारवाई करणे इत्यादी आहेत.
एमपीएससी अंतर्गत असलेल्या परीक्षा गट-अ आणि गट-ब या दोन्ही स्तरांवर अधिकारी पदांसाठी निवड करते.
काही पदांच्या परीक्षां साठी पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्व चाचणी अशा तीन टप्प्यांत होतात तर काहीं पदांसाठी पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा घेतल्या जातात.
पात्रता:
महाराष्ट्रराज्यातील रहिवासी प्रमाणपत्र असलेला कोणत्याही शाखेचे पदवीधर उमेदवार MPSC च्या परीक्षेला बसू शकताे.
वय पात्रता:
महाराष्ट्राचे अधिवासी असलेले उमेदवार ज्यांच्याजवळ महाराष्ट्राचे अधिवास/ रहिवासी प्रमाणपत्र असलेले उमेदवार परीक्षेला बसण्यासाठी पात्र आहेत.
उमेदवार वय 19 वर्षे पूर्ण झालेले असावे. MPSC नुसार
खुल्या गटातील उमेदवार 38 वर्षांपर्यंत आणि राखीव गटातील विद्यार्थी वयाच्या 43 वर्षापर्यंत या परीक्षेला बसू शकतात.
एमपीएससी अंतर्गत असलेल्या परीक्षा खालिल प्रमाने आहेत,
MPSC राज्य सेवा परीक्षा (विविध गट अ आणि गट ब राजपत्रित पदे)
MPSC महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
MPSC महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा
MPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा
MPSC दिवाणी न्यायाधीश (Jr Div), न्यायदंडाधिकारी (प्रथम श्रेणी) स्पर्धात्मक परीक्षा - दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी, प्रथम श्रेणी परीक्षा
MPSC सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा
MPSC सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल) श्रेणी-2, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट-ब
MPSC पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
MPSC विक्रीकर निरीक्षक परीक्षा
MPSC कर सहाय्यक परीक्षा गट-अ
MPSC सहाय्यक परीक्षा
MPSC लिपिक टंकलेखक परीक्षा
टिप: राज्यसेवा सारख्या परिक्षेला पात्र होण्यासाठी उमेदवाराला मराठी विषय अनिवार्य आसतो.
जर आम्ही दिलेली माहित आपणास उपयुक्त असल्यास कृपया कमेंट करुन कळवावे.
धन्यवाद!!!!!
Other links
मराठी जोक. मराठी चावट जोक. मराठी चुटुकले.
Link
Comments